Advertisement

'एटीकेटी'वरून मुंबई विद्यापीठात 'खडाजंगी'


'एटीकेटी'वरून मुंबई विद्यापीठात 'खडाजंगी'
SHARES

गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी निकालाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र अजूनही निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध गुरूवारी फुटला. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परीक्षा विभागाला टाळं ठोकलं. वातावरण इतकं तापलं की अखेर पोलिसांना आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 


एटीकेटीचं वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाने मे २०१७ च्या परीक्षांचे निकाल १९ सप्टेंबरला लागल्याचं जाहीर केलं. मात्र आजही हजारो विद्यार्थ्यांचे लागलेले नाहीत. असं असताना देखील विद्यापीठाने 'एटीकेटी'च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यामुळे निकाल लागायच्या आधीच विद्यार्थ्यांना एटीकेटीची परीक्षा द्यावी लागली. मात्र 'लॉ'च्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत परीक्षा देणार नाही, असा पवित्रा घेतला. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी विद्यापीठात ठिय्या अंदोलनही केलं. 

दरम्यान, या आंदोलनानंतर नवनियुक्त प्र कुलगुरू डाॅ. व्ही. एन. मगरे यांनी 'लाॅ'च्या एटीकेटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.


अखेर टाळं ठोकलं

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या महात्मा फुले परीक्षा भवनाला टाळं ठोकलं. या वेळी प्र कुलगुरूंना भेटण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लाऊन धरली. त्यामुळे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं. विद्यापीठाला टाळं ठोकण्यासाठी मुलींची टीम अघाडीवर होती. टाळं ठोकताना विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याने इनताज शेख या विद्यार्थीनीला दुखापत झाली. यावेळी तिथं एकही महिला पोलीस हजर नव्हती.  


आमचं हे तिसरं आंदोलन आहे. तरीही या झोपलेल्या विद्यापीठाला जाग येत नाहीय. त्यामुळे आज आम्ही ठिय्या अंदोलन केलं. जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कोणात्याही अश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही. आज आम्हाला प्र कुलगुरूंची भेट हवी आहे. त्याशिवाय आम्ही विद्यापीठ सोडणार नाही.

- सचिन पवार, अध्यक्ष स्टूडंट लॉ कौन्सिल


मी गेले महिनाभर विद्यापीठात घिरट्या घालत आहे. मी बी. कॉमची परीक्षा दिली आहे. माझ्या सगळ्या विषयांचे मार्क मला समजले. मात्र मार्केटींग या विषयात मला केवळ २  मार्क दिले आहेत. म्हणून मी माझा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी दिला आहे. हा निकाल मला अद्याप मिळालेला नाही.

- रिम शेख, विद्यार्थीनी



हेही वाचा-

अहो, हे चाललंय तरी काय!

सिनेट निवडणुकांंचीही डेडलाईन चुकणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा