Advertisement

सिनेट निवडणुकांंचीही डेडलाईन चुकणार?

विद्यापीठातील निकालाच्या गोंधळामुळे सिनेट निवडणुकांचं काम मागे पडल्याने या निवडणुकांसाठी पुढच्या वर्षीचाच मुहूर्त लागणार असं दिसतंय.

सिनेट निवडणुकांंचीही डेडलाईन चुकणार?
SHARES

निकाल घोषित करण्याच्या डेडलाईनची वाट लावल्यानंतर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांची डेडलाईनसुद्धा चुकवणार असल्याचं दिसत आहे. ३० नोव्हेंबर आधी सिनेट निवडणुका होणं अपेक्षीत आहे. मात्र सध्या विद्यापीठातील निकालाच्या गोंधळामुळे सिनेट निवडणुकांचं काम मागे पडल्याने या निवडणुकांसाठी पुढच्या वर्षीचाच मुहूर्त लागणार असं दिसतंय.


विद्यापीठ व्यस्त

मुंबई विद्यापीठ सध्या पुर्नमूल्यांकनाचे २८ हजार निकाल लावण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सिनेट निवडणुकांसाठी लागणारी तयारी अद्याप विद्यापीठात सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला सिनेट निवडणुकांसाठी मुदत वाढवून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहारही विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे करणार असल्याचं समजत आहे.


निवडणुकीच्या आखणीसाठी मुदत

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन कायद्यानुसार विद्यापीठाला सिनेट निवडणुकीची आखणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र मे महिन्यात घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्याप न लागल्यामुळे सिनेट निवडणुकांकडे विद्यापीठाचं दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलेली डेडलाईन पाळण्यात विद्यापीठ अपयशी ठरेल अशीच चिन्ह आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात ११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे सिनेट निवडणुका आणखी लांबणार हे निश्चित.


वेळ वाढवून मिळावी

सध्या विद्यापीठात कुलगुरूंच्या पदासहित बहुतांश सर्वच महत्त्वाच्या पदावरील अधिकारी हे 'प्रभारी' आहेत. परीक्षांचा निकाल लावण्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने या अधिकाऱ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष निकालांवर केंद्रीत केलं आहे. पुढील वर्षीपर्यंत या जागांवर कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. त्यामुळे सिनेट निवडणुकांसाठी वेळ वाढवून मिळावी, असं मत विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं.



हेही वाचा-

सिनेट निवडणुकीसाठी 70 हजार मतदारांची नोंदणी

पदवीधर मतदार नोंदणी केलीत का? नसेल तर हे वाचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा