सिनेट निवडणुकीसाठी 70 हजार मतदारांची नोंदणी

  Kalina
  सिनेट निवडणुकीसाठी 70 हजार मतदारांची नोंदणी
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यावर्षी 70 हजार मतदारांची नोंदणी झाल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे. या निवडणुकीसाठी 15 जुलैला अंतिम यादी जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.


  69 हजार अर्ज ऑनलाईन पद्धतीने

  सिनेट निवडणुकीसाठी 1 जून ते 30 जून या कालावधीत मतदार नोंदणी करण्यात आली. या कालावधीत सिनेट निवडणुकीसाठी एकूण 70 हजार अर्ज 130 महाविद्यालयाकडे आले. त्यापैकी 69 हजार 392 अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत. तर 3 हजार 427 अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. 10 जुलैला मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.


  चुका सुधारण्यासाठी 5 दिवस

  वगळलेले अर्ज आणि अर्जातील चुकीच्या नोंदी या पाच दिवसांच्या आत कुलसचिवांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. 15 जुलैला अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.
  हे देखील वाचा -

  31 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावा - राज्यपाल

  टीवायच्या निकालांसाठी 'टास्क फोर्स'


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.