Advertisement

अहो, हे चाललंय तरी काय!


अहो, हे चाललंय तरी काय!
SHARES

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी, अजब-गजब, लहरी, बेशिस्त अशा अनेक प्रकारच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांची पंचाईतच नव्हे तर थेट त्यांच्या करिअरचंच नुकसान झालंय. त्याची नुकसानभरपाई तर दूरच, पण अजून नवीन नवीन भयंकर कल्पना विद्यापीठाकडून राबवल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्रासात भरच पडत आहे. आणि याचा सर्वाधिक त्रास लॉच्या विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यापीठाच्या अशाच एका नव्या निर्णयामुळे लॉचे विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत.

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला मे २०१७ च्या परिक्षांचे निकाल जाहीर केले. आता तरी निकालाचा गोंंधळ संपेल असं विद्यार्थ्यांना वाटलं होतं. मात्र, नोव्हेंबर उजाडला तरी निकालांचा गुंता अजून काही सुटलेला नाही. बुधवारी ८ नोव्हेंबरपासून एटीकेटीची परीक्षा सुरू होत आहे. मात्र, आजही हजारो विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. आता निकालच लागले नाहीत, तर कळणार कसं की एटीकेटीची परीक्षा द्यायची आहे की नाही? अशा बुचकळ्यात विद्यार्थी पडले आहेत!


निकाल लागेपर्यंत परीक्षा देणार नाही

१९ सप्टेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. पण आता केटीची परिक्षा सुरू झाली, तरी पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचा पत्ताच नाहीये. त्यामुळे जोपर्यंत विद्यापीठ निकाल देत नाही, तोपर्यंत एटीकेटीची परीक्षा न देण्याच निर्धार लॉच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.


केवळ अाश्वासनेच मिळाली!

या आधी पुनर्मूल्यांकनाचे निकाल मिळावेत, वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा अंदोलने केली. मात्र, दरवेळी केवळ अश्वासने विद्यार्थ्यांना मिळाली. निकाल मात्र लागला नाही. त्यामुळे निकालाची वाट बघायची की परिक्षा द्यायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांचे सहकारी हे बहिरे, आंधळे आणि मुके झाले आहेत. त्यामुळे या विद्यापीठाला जाग येण्यासाठी आम्ही विद्यापीठात ठिय्या अांदोलन करणार आहोत. 'सेव्ह मुंबई युनिव्हर्सिटी' या कॅम्पेन अंतर्गत हे अंदोलन असणार आहे. 

सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिलहेही वाचा

15 नोव्हेंबरपर्यंत सर्व निकाल लागणार?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा