Advertisement

15 नोव्हेंबरपर्यंत सर्व निकाल लागणार?

'येत्या ३ तारखेला होणाऱ्या मीटिंगमध्ये या सगळ्या मागण्या मांडल्या जातील,' अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली आणि '१५ नोव्हेंबरपर्यंत सर्व निकाल लावले जातील' असा शब्द कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

15 नोव्हेंबरपर्यंत सर्व निकाल लागणार?
SHARES

मंगळवारी पुन्हा एकदा अश्वासन मिळाल्यानंतर बुधवारी कुलगुरूंची भेट घ्यायचीच असा निश्चय विद्यार्थ्यांनी केलेला. बुधवारी ३ वाजल्यापासून विद्यापीठात विद्यार्थ्यांनी ठाण मांडलं होतं. आणि अखेर विद्यार्थ्यांच्या ५० टक्के मागण्या मान्य झाल्या. 'येत्या ३ तारखेला होणाऱ्या मीटिंगमध्ये या सगळ्या मागण्या मांडल्या जातील,' अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली आणि '१५ नोव्हेंबरपर्यंत सर्व निकाल लावले जातील' असा शब्द कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.


मंगळवारी पुकारलेले अंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराला त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा अंदोलनं केली, अमेय मालशे या लॉच्या विद्यार्थ्याने उपोषणाचे हत्यारही उपसले. मात्र, ढिम्म विद्यापीठाने निकाल काही लावले नाहीत. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले. या वेळी विद्यार्थी विद्यापीठातच ठाण मांडून बसले. यावेळी विद्यार्थ्यांनी सेव्ह मुंबई विद्यापीठाचा नारा दिला. आणि कुलगुरूंच्या भेटीची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही पाठींबा दिला.


अखेर कुलगुरूंची भेट झालीच

बुधवारी विद्यापीठात दुपारपासून ठांड मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांची अखेर प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याशी भेट झाली. डॉ. मुणगेकरही यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भेटण्याअगोदर कुलगुरूंची माजी कुलगुरूंशी या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या कुलगुरूंसमोर मांडल्या. '३ तारखेला होणाऱ्या मीटिंगमध्ये या मागण्यांचा विचार केला जाईल', असे अश्वासन प्रभारी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले.


या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

१. पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या सर्व विद्यर्थ्यांचे निकाल लवकरात लवकर लावावेत

२. मेरीट ट्रॅक कंपनीवर कारवाई करावी

३. द्वितीय सत्रात होणाऱ्या परिक्षांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने लावू नयेत

४. निकाल रखडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करावे


एक मागणी मान्य

विद्यापीठाने एकीकडे एटीकेटीसाठीच्या अर्जाची फी कमी केली, तर दुसरीकडे परीक्षेच्या फीमध्ये वाढ केली. ७०० रूपये असणारी फी १५०० रूपये केली. या फी वाढीला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. ती मागणी विद्यापीठाने मान्य केली आहे. आणि २५ टक्के फी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

आमच्या मागण्यांवर प्रभारी कुलगुरुंनी तोडगा काढण्याचं अाश्वासन दिलं आहे. आम्ही बराच वेळ विद्यापीठाच्या आवारात ठाण मांडून बसलो होतो. आता ३ तारखेपर्यंत तोडगा निघाला नाही, तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत.

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट्स लॉ कौन्सिल



हेही वाचा

मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा - डाॅ. मुणगेकर

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'गोलमाल अगेन' - नवाब मलिक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा