मुंबई विद्यापीठाच्या दुष्टचक्रात अडकले 'हे' विद्यार्थी


  • मुंबई विद्यापीठाच्या दुष्टचक्रात अडकले 'हे' विद्यार्थी
  • मुंबई विद्यापीठाच्या दुष्टचक्रात अडकले 'हे' विद्यार्थी
SHARE

तब्बल ६ महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल अजूनही हजारो विद्यार्थ्यांच्या हाती पडलेले नाहीत. एकीकडे उशीरा मिळालेल्या निकालामुळे काही विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणाचं टेन्शन आहे, तर दुसरीकडे काहींच्या निकालात असंख्य चुका असल्याने त्यांची शैक्षणिक वाटचाल संकटात सापडली आहे.


किमान 'पास' तरी करा

विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारापुढे विद्यार्थी हतबल झालेत. आम्हाला आमचे निकाल द्या. आमचं भविष्य त्यावर अबलंबून आहे. असंच गाऱ्हाणं सध्या विद्यार्थी विद्यापीठापुढे घालत आहेत.


प्राजक्ता पाहतेय निकालाची वाट

त्यापैकीच एक आहे प्राजक्ता हजारे. प्राजक्ताने २०१७ ला मुंबई विद्यापीठातून टीवायबीकॉमची परीक्षा दिली. प्राजक्ताची हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळख आहे. ती कायमच परीक्षेत ७० हून अधिक मार्क मिळवते. यंदाही तिने मन लावून अभ्यास केला आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. पण मुंबई विद्यापीठाचा निकालाचा घोळ बघता प्राजक्ताला निकालाची चिंता वाटू लागली.उशीरा का होईना तिचा निकाल मिळाला खरा; पण निकाल बघताच प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. प्राजक्ताला ६ विषयांत 'ओ' ग्रेड मिळाली होती. तर 'एक्स्पोर्ट मार्केटींग' विषयात प्राजक्ताला चक्क नापास असा शेरा आला होता. 'एक्स्पोर्ट मार्केटींग'साठी ७५ मार्कांचा पेपर आणि २५ मार्कांचे इंटर्नल होते. इंटर्नलला प्रजाक्ताला २५ पैकी १७ गुण कॉलेजने दिलेत. तर लेखीमध्ये ७५ पैकी केवळ १२ च गुण प्रजक्ताला मिळालेत.

आपण नापास होणे शक्यच नाही, अशी खात्री प्राजक्ताला होती. त्यामुळे या पेपरासाठी तिने पुनर्मुल्यांकनाचा अर्ज भरला. आज २ महिने झाले तरी प्रजाक्ताचा निकाल जाहीर झालेला नाही. २५ ऑक्टोबरला 'एटीकेटी'चा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे हा फॉर्म भरायचा की निकालची वाट बघायची? असा प्रश्न प्राजक्ताला सतावतोय.

विद्यापीठातील अांदोलनात प्राजक्ताही सहभागी झाली होती. यावेळी आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याची खंत 'मुंबई लाइव्ह'कडे बोलून दाखवली. जास्त मार्क नकोत किमान पास करा. अशी मागणी सध्या प्राजक्ता विद्यापीठाकडे करतेय. प्राजक्ताला एमबीए करायचे आहे. मात्र नापास शेरा असल्यामुळे ती पुढील शिक्षणासाठी अर्ज करू शकत नाही.


रोज फेऱ्या मारणं अशक्य

मुंबई विद्यापीठाला ७०० संलग्नित कॉलेज आहेत. कोकण, ठाणे जिल्हा अशा अनेक ठिकाणांवरून विद्यार्थ्यांना निकालासाठी दररोज विद्यापीठात येणंही आता परवडत नाही.विनायक शेटगे गेल्या काही दिवसांपासून मुरूड-जंजिरावरून मुंबई विद्यापीठात ये-जा करत आहेत. मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण विनायकचे नावच अद्याप निकालाच्या यादीत आलेले नाही. दरवेळी मुंबईत येऊन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न ते करतात, पण आजपर्यंत त्यांना एकदाही विद्यापीठातील वरिष्ठ अधिकऱ्यांनी भेट दिलेली नाही. निकाल वेबसाईटवर दिसतच नसल्यामुळे आपण पास झालो आहोत की नापास हेच शेडगे यांना कळलेले नाही. दरवेळी मुंबई- मुरूड प्रवासासाठी ५०० रूपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे निकालासाठी दररोज येणं शक्य नसल्याचं त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.हेही वाचा -

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या