यंदाही निकाल गोंधळ होणार?

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालांच्या घोषणेकड सर्वांचं लक्ष लागलेलं असताना लॉ शाखेच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालावरून नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. 

लॉ शाखेची एटीकेटी परीक्षा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असताना अद्याप हिवाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाच्या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळ लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांनी आता या रखडलेल्या निकालासाठी नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे धाव घेतली आहे.

परीक्षांसाठी तारीख पे तारीख

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळ गेल्यावर्षी निर्माण झालेल्या निकाल गोंधळाचा सर्वाधिक फटका लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला होता. त्याचे पडसाद विद्यापीठानं घेतलेल्या हिवाळी सत्र परीक्षांमध्येही उमटले होते. परीक्षांचे निकाल उशिरान लागल्यान अनेक विद्यार्थ्यांनी आंदोनलनंही केली. त्यामुळे विद्यापीठानं जाहीर केलेल्या उन्हाळी सत्र परीक्षांचं वेळापत्रकपण पुढे ढकलण्यात आलं.

येत्या २५ आणि २६ जूनपासून लॉ शाखेच्या सेमिस्टर ५, ७ आणि ९ ची परीक्षा सुरू होत आहे. यात एटीकेटीच्या परीक्षांचा समावेश आहे. दुसरीकड या विद्यार्थ्यांना पूनर्मुल्यांकनाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

आश्वाशन देऊनही निकाल नाही

काही दिवसंपूर्वी हे निकाल वेळेवर जाहीर करण्यात येतील, असं आश्वासन देखील विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाकडून देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही हे निकाल जाहीर न झाल्यानं एटीकेटीची परीक्षा द्यायची का, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यापिठाने आश्वाशन दिल्यानंतरही लॉच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी वणवण करत फिराव लागत असल्यान स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यापीठाने निकालासंदर्भात वेळावेळी आश्वासनं देऊन ती पाळलेली नाहीत. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावी अशी आमची मागणी आहे.

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

अभाविप कुलगुरू दरबारी

मागील वार्षीच्या निकालातील अभूतपूर्व गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. परंतुं त्यामुळे विद्यापीठाची पतही ढासळली आहे. यावर्षीच्या एप्रिल-मे मधील परीक्षा वेळपत्रकातील गोंधळाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर अभाविप शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांची भेट घेऊन विद्यापीठातील सर्व निकाल वेळेत लावण्याची मागणी केली. निकालांचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल जाहीर होतील, असं आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचं अभाविपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ अद्याप सुरूच

एलएलएमच्या गोंधळाला 'हेच' जबाबदार!

पुढील बातमी
इतर बातम्या