Advertisement

एलएलएमच्या गोंधळाला 'हेच' जबाबदार!

मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. सुहास पेडणकेर यांना दाद मागणारं पत्र दिल आहे. या पत्रात त्यांनी सेमिस्टर ३ च्या निकाल गोंधळासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका रश्मी ओझा यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एलएलएमच्या गोंधळाला 'हेच' जबाबदार!
SHARES

निकाल वेळेवर न लागणं, वेळापत्रकात वारंवार होणारे बदल, विद्यार्थ्यांना गुण देताना शिक्षकांचा मनमानी कारभार यामुळे हैराण झालेल्या मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) च्या विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. सुहास पेडणकेर यांना दाद मागणारं पत्र दिल आहे. या पत्रात त्यांनी सेमिस्टर ३ च्या निकाल गोंधळासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका रश्मी ओझा यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नेमक प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठातील मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ मध्ये तीन पेपर असून त्यात एका विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा, तर दोन लेखी परीक्षेचा समावेश आहे. हे तिन्ही पेपर १०० गुणांचे आहेत. त्यातील प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्याला किमान ५० गुण मिळणं आवश्यक आहे.


मर्जीतील विद्यार्थ्यांना झुकतं माप

गोंधळाचा विषय असा की, 'ह्युमन राईट लॉ' या विषयाच्या प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण विद्यापीठातील शिक्षक देत असल्याने शिक्षकांनी केवळ आपल्या मर्जीतील विद्यार्थ्यांना १०० पैकी ७५ गुण देऊन पास केल्याचा आणि उर्वरीत विद्यार्थ्यांना मुद्दाम नापास करण्यासाठी ३५ ते ४० गुण दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी लेखी परीक्षेत मात्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रॅक्टिकल परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लेखी परीक्षेत चक्क नापास झाले आहेत.


'असं' आहे प्रॅक्टिकल परीक्षेचं स्वरूप

  • टिचींग- ४० गुण,
  • ग्रुप डिस्कशन- ५० गुण
  • हजेरी- १० गुण


७६ पैकी २२ विद्यार्थी नापास

मुंबई विद्यापीठातून 'ह्युमन राईट्स लॉ' या विषयाच्या परीक्षेला एकूण ७६ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण मिळाल्याने नापास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. परंतु प्रॅक्टिकल परीक्षेत कमी गुण मिळाल्याने या सर्व विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे.



पत्रात नेमकं काय?

मुंबई विद्यापीठातील एलएलएम सेमिस्टर ३ प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण प्राध्यापकांच्या हातात असतात. त्यामुळे प्राध्यापक त्यांच्या मनाप्रमाणे मार्क देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांचं नुकसान करत आहेत. त्याशिवाय एलएलएम सेमिस्टर ४ मध्ये २०० गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असते. सेमिस्टर ३ मध्ये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, त्याचप्रमाणे सेमिस्टर ४ मध्येही त्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी या पत्राद्वारे कुलगुरूंना करण्यात आली आहे.


प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करणं ही बाब खरंतर आश्चर्यचकित करणारी आहे. परंतु प्रॅक्टिकल परीक्षेत पूर्नमुल्याकंन करणं अशक्य असेल किंवा पूर्नमुल्यांकन मागण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना नसेल तर त्या परीक्षेत प्राध्यापक त्यांना नापास कसं करू शकतात. तसंच यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. तसंच या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही आम्ही पत्र लिहिलं आहे.
- अॅड. यज्ञेश कदम, मुंबई उच्च न्यायालय



ओझा यांना तात्काळ काढा

या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या लॉ च्या प्राध्यापक रश्मी ओझा यांच्या ह्युमन राईट्स विभाग तात्काळ काढून त्यांच्या जागी चांगल्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी. दरम्यान एलएलएम सेमिस्टर ३ मध्ये ह्युमन राईट्स ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल परीक्षेत चुकीच्या रितीने नापास केलेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यात यावं. त्याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या लॉ विभागाच्या मनमानी कारभाराकडे आपण तात्काळ लक्ष देऊन चौकशी करावी, असंही या पत्रात लिहिलं आहे.


एलएलएम सेमिस्टर ३ मध्ये प्रॅक्टिकलचे एकूण ९० गुण माझ्या हातात असतात. तर १० गुण हे विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत असतात. विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल परीक्षेत चांगली कामगिरी केली नसेल, तर त्यांना फक्त हजेरीबाबतचे गुण दिले जातात. तसंच या वर्षी ज्या मुलांना प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण मिळाले आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली असल्याने मी त्यांनी ते गुण दिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी २००३ पासून ह्युमन राईट्सची प्रॅक्टिकल परीक्षा घेत आहे. तेव्हापासूनचं माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड असून मला या प्रकरणात अडकवलं जात आहे.
- रश्मी ओझा, प्राध्यापिका, एलएलएम


 एलएलएम सेमिस्टर ३ च्या विद्यार्थ्यांच्या एकंदर समस्या विद्यापीठ प्रशासनाने अग्रस्थानी ठेवली असून त्यावर काय तोडगा काढता येईल याबाबत सध्या आम्ही विचार करत आहोत
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

'लाॅ'च्या निकालातील चूक लपवण्यासाठी फेरपरीक्षेचा घाट!

'लॉ' च्या वेळापत्रकात पुन्हा बदल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा