Advertisement

'लाॅ'च्या निकालातील चूक लपवण्यासाठी फेरपरीक्षेचा घाट!

'लॉ'च्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फॉर्मसोबत मार्कशीटची कॉपी स्वत:च वेबसाईटवरून डाऊनलोड करून लावण्यास सांगितलं आहे. यावरून विदयापीठ प्रशासनाने लावलेला चुकीचा निकाल दुरुस्त न करता विद्यार्थ्यांवरच बळजबरी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

'लाॅ'च्या निकालातील चूक लपवण्यासाठी फेरपरीक्षेचा घाट!
SHARES

काही दिवसांपूर्वी मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ परीक्षांचा निकाल जाहीर झाला. या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी हैराण झालेले असताना विद्यापीठाने नवा परीक्षा गोंधळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या निकालातील चूक लपवण्यासाठी विद्यापीठाने फेरपरीक्षेचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठामार्फत १८ एप्रिलला मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ च्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा फॉर्म भरण्याची नोटीस देखील जाहीर केली आहे.


विद्यार्थ्यांवर बळजबरी

या नोटीशीत 'लॉ'च्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फॉर्मसोबत मार्कशीटची कॉपी स्वत:च वेबसाईटवरून डाऊनलोड करून लावण्यास सांगितलं आहे. यावरून विदयापीठ प्रशासनाने लावलेला चुकीचा निकाल दुरुस्त न करता विद्यार्थ्यांवरच बळजबरी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.



नेमक प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ परीक्षेचे ३ पेपर असतात. या ३ पेपरपैकी एक परीक्षा प्रॅक्टिकल तर २ लेखी परीक्षा होतात. हे तिन्ही पेपर १०० मार्कांचे असतात. यातील प्रत्येक परीक्षेत विद्यार्थ्याला किमान ५० गुण मिळवणं अपेक्षित असतं. तसंच या प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण विद्यापीठातील शिक्षक देत असल्याने शिक्षकांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना १०० पैकी ७५ गुण देऊन पास करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.


प्रक्टिकलच्या गुणात भेदभाव

तर इतर विद्यार्थ्यांना अवघे ३५ ते ४० गुण दिले मिळाल्याचं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जाहीर झालेल्या निकालात लेखी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये नापास करण्यात आलं आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतही नापास दाखवण्यात आलं आहे. ७६ विद्यार्थ्यांमधून २२ विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नापास झाले आहेत.



शिक्षणमंत्र्यांचं दुर्लक्ष

यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांनी आणि अॅड यज्ञेश कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे तसंच विद्यापीठातील प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याशी फोन किंवा ई-मेलद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणात कोणीही लक्ष दिलं नाही.


या प्रकरणात नक्कीच गोंधळ असून परीक्षेची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. सोबत सत्य उघड होईपर्यंत लॉ शाखेच्या प्राध्यापिका रश्मी ओझा यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत आहे.
- अॅड. यज्ञेश कदम, वकील, मुंबई उच्च न्यायालय

याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने प्राध्यापक रश्मी ओझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही



हेही वाचा-

निकाल लागायच्या आधीच पुढच्या परीक्षा जाहीर, 'लाॅ'चे विद्यार्थी हैराण

परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाला उशीरा जाग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा