Advertisement

परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाला उशीरा जाग


परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाला उशीरा जाग
SHARES

मार्च महिना उलटला तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी सत्र परीक्षा साठीचं वेळापत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याविरोधात विद्यार्थी पालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला जाग आली आहे. परीक्षा विभागाने शुक्रवारी एकूण ६७ परीक्षांच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. विद्यापीठाच्या या घोषणेने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


'लाॅ'चे निकाल शिल्लक

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षांच्या निकालाच्या कामांत विद्यापीठ प्रशासन पूर्णत: व्यस्त झाले आहेत. लॉ अभ्यासक्रमासह अनेक परीक्षांचे निकाल जाहीर होणं बाकी असून यासाठी परीक्षा विभागाची जय्यत तयारी आहे. या व्यस्त कामात परीक्षा व मूल्यमापन विभागाने मार्च महिना सुरू झाला तरी उन्हाळी सत्र परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.


६७ परीक्षांच्या तारख्या जाहीर

त्यामुळे यंदा या परीक्षा लांबणीवर जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर याप्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने शुक्रवारी सुमारे ६७ परीक्षांच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. या संदर्भात परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्या सहीचं पत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आलं आहे.


या परीक्षांच्या तारखा जाहीर

  • टीवायबीए जर्मन स्टडीज- २३ मार्च
  • टीवायबीए इंट्रीग्रेटड स्टडीज- २६ मार्च
  • एम इन इंग्लिश- ३ एप्रिल
  • एलएलएम सेमिस्टर वन- ११ एप्रिल
  • टीवायबीए सेमिस्टर सहा- १२ एप्रिल
  • एम. ए. सेमिस्टर वन- १८ एप्रिल
  • टीवायबीए सेमिस्टर पाच - २६ एप्रिल


यावेळी परीक्षा वेळेवर सुरु करुन, परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील. यासाठी महाविद्यालये व शिक्षकांनी मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन मी व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे करीत आहोत.
- डॉ. अर्जुन घाटूळे,संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा