मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन होणार

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या डिसेंबर-जानेवारमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. यासाठी शाखेनुसार पदवी, पदव्युत्तर क्लस्टर कॉलेजची विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करणार आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन माध्यमातून डिसेंबर ३१ पर्यंत घेण्यात येणार आहेत. तर पदव्युत्तर परिक्षेबाबत स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. व्यवसायिक अभ्यासक्रम थेअरी परीक्षा १५ जानेवारी २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहेत. तर प्रथम वर्षाच्या वर्गाचे वेळापत्रक प्रवेश झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

असा असेल पॅटर्न 

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम

- ६० गुणांची ऑनलाईन थिअरी परीक्षा

- ५० बहुपर्यायी प्रश्न देण्यात येतील, त्यापैकी ४० प्रश्न सोडवावे लागणार

- वेळ १ तास दिला जाणार

व्यवसायिक अभ्यासक्रम ( इंजिनियरिंग, फार्मसी, एमसीए)

- ८० गुणांची ऑनलाइन थिअरी परीक्षा

- ४० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न, त्यासाठी 1 तासांचा वेळ

- ४० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न, त्यासाठी 1 तासांचा वेळ

विधी शाखा

- एकूण ६० गुणांची परीक्षा

- ३० गुणांची बहुपर्यायी परीक्षा, वेळ अर्धा तास

- ३० गुणांची वर्णनात्मक परीक्षा, वेळ १ तास


हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या


पुढील बातमी
इतर बातम्या