आता अकरावी प्रवेशासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना अर्ज करूनही प्रवेश मिळू शकलेला नाही. या सर्व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.

शैक्षणिक वेळापत्रक कोलमडणार

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत ४७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, त्यातील १८ हजार ६९९ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्यक्रम असलेलं कॉलेज मिळालं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंत संबधित कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याशिवाय अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन महिना उलटून गेला तरी सुमारे पाच हजार विद्यार्थ्याचं एकाही यादीत नाव जाहीर झालेलं नाही. तसेच यंदा विविध कारणामुळे २० दिवस लांबणीवर पडल्यानं यंदाचं शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरवर्षी ऑगस्ट अखेरीस पहिली चाचणी परीक्षा होते. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियाच अद्याप पूर्ण झालेली नाही. यावर्षी सरकारने कॉलेजांमध्ये ७० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच काय? जरी अतिरिक्त वर्ग घेतले तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेता येणार नाही. यामुळे ज्युनिअर कॉलेजांचे अकरावीचे वेळापत्रक कोलमडणार आहे. उर्वरित कालावधीत अकरावीसाठी आवश्यक शैक्षणिक दिवस पूर्ण होऊ शकणार नाही. त्यमुळे यंदा पहिले सत्र ५ नोव्हेंबरपर्यंत असले तरी अजुन काही दिवस पुढे वाढवून द्यावी.

- प्रशांत रेडिज, सचिव, मुख्याध्यापक संघ


हेही वाचा -

अकरावीचे ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच!

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ


पुढील बातमी
इतर बातम्या