Advertisement

अकरावीचे ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच!

अकरावीच्या ४ नियमित याद्या, एक विशेष यादी जाहीर होऊनही अद्याप ९ हजार ००९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसल्यानं या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

अकरावीचे ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच!
SHARES

सध्या मुंबईसह राज्यभरात अकरावी अॅडमिशनला सुरूवात झाली आहे. याच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली विशेष गुणवत्ता यादी १८ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई विभागातून ३८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून ४७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी पहिल्या विशेष फेरीसाठी अर्ज केले होते. विशेष म्हणजे अकरावीच्या ४ नियमित याद्या, एक विशेष यादी जाहीर होऊनही अद्याप ९ हजार ००९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसल्यानं या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.


सर्वाधिक प्रवेश कुठे?

चौथ्या यादीप्रमाणं पहिल्या विशेष फेरीसाठी वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक २७ हजार ०८२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखेसाठी ८ हजार ७३४ आणि कला शाखेसाठी २ हजार २२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. परंतु चौथ्या यादीत एमसीव्हीसीसाठी फक्त ५२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.


कुठल्या बोर्डाचे किती विद्यार्थी?

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशाच्या विशेष गुणवत्ता यादीत पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ६९९ आहे. तर एकूण प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ५६७ इतकी आहे. तसंच नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावीसाठी राज्य महामंडळाच्या ३५ हजार ९७० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलं असून त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९८७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तसंच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या १ हजार ६१० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.


'या' वेबसाइटवर क्लिक करा

अकरावी प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी http://mumbai.11thadmission.net या वेबसाइटवरील Centralized Allocation Special Round 1 या ऑप्शनला क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याला प्रवेश मिळालेल्या कॉलेजची माहिती मिळेल. विशेष गुणवत्ता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १८ ते २१ ऑगस्टदरम्यान आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.हेही वाचा-

अकरावी प्रवेश प्रक्रियेत माहिती अधिकार कायद्याला हरताळसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा