Advertisement

अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीचं वेळापत्रक जाहीर

शालेय शिक्षण विभागानं यंदाही विशेष फेरीचं आयोजन केलं असून गुरूवारी ९ ऑगस्टला या फेरीच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार येत्या १८ ऑगस्टला अकरावीची पहिली विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून यामुळं प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीचं वेळापत्रक जाहीर
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसह इतरत्र अकरावी अॅडमिशनला सुरूवात झाली असून अकरावी अॅडमिशनची चौथी व शेवटची यादी मंगळवारी ७ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. या यादीत ४९ हजार ०६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले, तरी अद्याप ३२ हजार ००१ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.


विशेष फेरी

या सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागानं यंदाही विशेष फेरीचं आयोजन केलं असून गुरूवारी ९ ऑगस्टला या फेरीच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार येत्या १८ ऑगस्टला अकरावीची पहिली विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून यामुळं प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.



किती अर्ज

यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे अगदी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही चौथी फेरी होऊनही प्रवेश मिळालेला नाही. यंदा अकरावीच्या नियमित फेऱ्यांसाठी २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी १ लाख ३० हजार ८५७ विद्यार्थ्यांनी कॉलेजात प्रवेश निश्चित केले आहेत. परंतु अद्याप ३२ हजार ००१ विद्यार्थ्यांचं कोणत्याही यादीत नाव न आल्यानं त्यांनी अकरावीत प्रवेश घेतलेला नाही. या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही विशेष फेरी फार महत्त्वाची असणार आहे.


असं असेल वेळापत्रक

  • १० ऑगस्ट- चौथ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी
  • ९ ते ११ ऑगस्ट- काॅलेजांनी रिक्त जागा अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सामाविष्ट करणं
  • १३ ऑगस्ट- पहिल्या विशेष फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर करणं
  • १३ ते १४ ऑगस्ट- प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरणं
  • १८ ऑगस्ट- पहिल्या विशेष फेरीची यादी जाहीर करणं
  • १८ ते २१ ऑगस्ट- यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं


अर्ज बदल करण्याची संधी

शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना चारही फेरीत नाव आलेलं नाही त्यांना त्यांच्या अर्जात बदल करता येणार आहे. त्याशिवाय यादीत नाव येऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही अशा विद्यार्थ्यांनाही अर्ज बदल करण्याची संधी या विशेष फेरीत देण्यात आली आहे.


'इथं' बघा वेळापत्रक

परंतु या विशेष फेरीत पहिला पसंतीक्रम मिळूनही कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या किंवा प्रवेश फी भरूनही काही कारणास्तव प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार नाही. त्याशिवाय या विशेष फेरीतही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेश दिलं जाणार आहेत. या संदर्भातील वेळापत्रक गुरुवारी अकरावी प्रवेशाच्या https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

अकरावी प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत गोंधळ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा