Advertisement

अकरावी प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अकरावी प्रवेशाची चौथी यादी ७ ऑगस्टला जाहीर झाली अाहे. शालेय शिक्षण विभागाने चौथ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अकरावी प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
SHARES

अकरावी प्रवेशाची चौथी यादी ७ ऑगस्टला जाहीर झाली. मात्र, ७ ऑगस्टपासून तीन दिवस पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मुंबई आणि ठाण्यातील ज्युनिअर कॉलेजांतील बहुतांश शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले अाहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने चौथ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित करण्यात येणार आहे.


कामकाजावर परिणाम 

राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी आणि शिक्षण विभागाकडून होणारा त्रास वाचवण्यासाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीनेही तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यामुळे बुधवारी अनेक शाळा व कॉलेज बंद राहिली. बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅड टीचर्स युनियन (बुक्टू) या कॉलेज प्राध्यापक संघटनेनेही संपाला पाठिंबा दर्शविला आहे. याचा थेट परिणाम कॉलेजांतील कामकाजावर दिसून आला.


५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीची चौथी यादी मंगळवारी ७ ऑगस्टला जाहीर झाली असून या यादीत मुंबई विभागातील  ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले अाहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर बुधवारी बहुतांश विद्यार्थ्यांनी कॉलेज गाठले. मात्र तेथे कामकाज बंद असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यात काही नामांकित कॉलेजांचाही समावेश आहे. त्याशिवाय गुरुवारी ९ ऑगस्ट मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती. यानुसार रात्री उशीरा शालेय शिक्षण विभागाने एक दिवसांची मुदतवाढ देत १० तारखेपर्यंत प्रवेश घेण्याची मुभाा विद्यार्थ्यांना दिली आहे.



चार फेऱ्यांनंतरही ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अशा प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. या विशेष फेरीपूर्वी अल्पसंख्याक कोट्यातील जागा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. याची प्रकिया गुरुवारी ९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या विशेष फेरीतही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेश दिले जातील.  या संदर्भातील वेळापत्रक गुरुवारी अकरावी प्रवेशाच्या https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे.
- सुवर्णा खरात, सहसचिव, शालेय शिक्षण विभाग



हेही वाचा -

महाराष्ट्र बंद, मुंबईत अनेक शाळांना सुट्टी

अकरावीच्या विशेष फेरीचं वेळापत्रक लवकरच - शिक्षण उपसंचालक




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा