Advertisement

अकरावीची चौथी गुणवत्ता यादी जाहीर, ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश


अकरावीची चौथी गुणवत्ता यादी जाहीर, ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
SHARES

सध्या मुंबईसह इतर ठिकाणी अकरावीच्या अॅडमिशनला सुरुवात झाली आहे. याच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथी गुणवत्ता यादी मंगळवारी ७ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई विभागातून ४९ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालं असून ८१ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी चौथ्या फेरीसाठी अर्ज केलं होतं.


३ हजार ६७१ विद्यार्थ्यांना प्रवेश

तिसऱ्या प्रवेशप्रक्रियेतील यादीप्रमाणेच चौथ्या यादीतही वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक ३२ हजार १०९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखेसाठी १२ हजार ७७३ आणि कला शाखेसाठी ३ हजार ६७१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. परंतु, चौथ्या यादीत एमसीव्हीसीसाठी फक्त ५०९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.


एकूण प्रवेश

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशाच्या चौथ्या गुणवत्ता यादीत पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार २४९ आहे. तर एकूण प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४९ हजार ६२ इतकी आहे. तसंच नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावीसाठी राज्य महामंडळाच्या ४५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलं असून त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १ हजार २८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तर आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.


प्रवेशाची प्रक्रिया

अकरावी प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवरील Centralized Allocation Result 4 या ऑप्शनला क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या विद्यालयाची माहिती मिळेल. चौथ्या गुणवत्ता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ ते ९ ऑगस्टदरम्यान आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाला नसेल त्यांना मात्र विशेष यादीची वाट पाहावी लागणार आहे.


हेही वाचा -

अकरावीच्या चौथ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 'जैसे थे'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा