Advertisement

अकरावीच्या चौथ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 'जैसे थे'


अकरावीच्या चौथ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 'जैसे थे'
SHARES

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांची चौथी यादी मंगळवारी ७ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. अकरावीच्या तिसऱ्या यादीनंतर ऑनलाइन जागा, इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यासह एकूण ८० हजार जागा शिल्लक आहेत. त्यासाठी अर्ज केलेल्या ८१ हजार ६३ विद्यार्थ्यांपैकी अकरावीच्या चौथ्या यादीत ४९ हजार ०६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यामुळे ७० ते ७५ टक्क्यांदरम्यान असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीची वाट बघावी लागणार आहे.


२ लाख ४० हजार अर्ज

सध्या मुंबईसह, नवी मुंबई, पालघर, ठाणे याठिकाणी मिशन अकरावी अॅडमिशनला जोरात सुरुवात झाली असून आतापर्यंत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन यादी जाहीर करण्यात आल्या. या तिन्ही यादी मिळून १ लाख ९ हजार ६४४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केलं असून अकरावी अॅडमिशनसाठी जवळपास २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे अद्याप यादीत नाव न आलेल्या तसंच तिन्ही फेरीत प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चौथी यादी महत्त्वाची ठरणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेश मिळाले नाहीत त्यांच्यासाठी विशेष फेरी राबवण्यात येणार आहे.


कटऑफ ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत

मंगळवारी जाहीर झालेल्या एफवाय प्रवेशाच्या यादीचा कटऑफही ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक नामांकित कॉलेजचा कटऑफ ८५ ते ९० टक्के असल्यानं ७० ते ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यर्थ्यांची चांगलीच पंचायत झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे यासर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी फार महत्त्वाची ठरणार आहे.


नामांकित कॉलेजचा कटऑफ

कॉलेज
कला
विज्ञान
  वाणिज्य
केसी कॉलेज
८८.८३
८५.३३
९०
जयहिंद कॉलेज
९१.३३
८५.२
९०.३३
एच आर कॉलेज


९०
एन एम कॉलेज


८९.२
मिठीबाई कॉलेज
८४.८३
८५.८
८८.८३
पोद्दार कॉलेज


९१
रूईया कॉलेज
९३.८
९१.२

रूपारेल कॉलेज
८४.६
८८.४
८८.६

सेंट झेविअर्स कॉलेज
९७.५
८५.८

वझे केळकर कॉलेज
७७.२
९२.८
९०.२

हेही वाचा -

इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत गोंधळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा