Advertisement

अकरावी प्रवेश प्रक्रियेत माहिती अधिकार कायद्याला हरताळ

सिस्कॉम या संस्थेनं माहिती अधिकाऱ्याच्या कायद्यानुसार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती मागवली होती. या संस्थेमार्फत आतापर्यंत १३९ अर्ज देण्यात आले असून त्यातील फक्त २७ अर्जांनाच अकरावी प्रवेशप्रक्रिया समितीनं उत्तर दिली आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत माहिती अधिकार कायद्याला हरताळ
SHARES

 अकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी काही शिक्षण संस्थांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. परंतु, माहिती अधिकारात दाखल झालेल्या १३९ अर्जांपैकी फक्त २७ अर्जांना आतापर्यंत उत्तरं मिळाली असल्याचं धक्कदायक वास्तव उघडकीस आलं आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार सुरू असून तो उघडकीस येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा अारोप अाता सिस्कॉम संस्थेने केला अाहे.


प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात 

अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी त्रास व्हावा या हेतूनं शिक्षणमंडळानं अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावेळी ही प्रक्रिया फार सोयीस्कर, सुलभ, व सोपी असून त्याचा कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार ऩाही असा दावाही शिक्षण विभागाने केला होता. परंतु ही प्रक्रिया सुरू केल्यापासून वेळेवर यादी जाहीर न झाल्यानं, कधी सर्व्हर डाऊन, कधी तांत्रिक बिघाड यांसारख्या एक ना अनेक कारणांमुळं ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


अधिकाऱ्यांची कार्यशैली अपारदर्शक

या सर्व बाबी लक्षात घेऊन सिस्कॉम या संस्थेनं माहिती अधिकाऱ्याच्या कायद्यानुसार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती मागवली होती. या संस्थेमार्फत आतापर्यंत १३९ अर्ज देण्यात आले असून त्यातील फक्त २७ अर्जांनाच अकरावी प्रवेशप्रक्रिया समितीनं उत्तर दिली आहेत. माहितीच्या अधिकारात वारंवार माहिती मागूनही माहिती न देणं, कारभारात व कामकाजात पारदर्शकता येऊ न देणं ही काही अधिकाऱ्यांची कार्यशैली असल्याचा आरोप सिस्कॉम संस्थेच्या वैशाली बाफना यांनी केला आहे. विशेष म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे शिक्षण संचालकांना याबाबत सुचना देऊनही त्यांच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे.



अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आली असली तरी त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रवेश प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार सुरू असून तो उघडकीस येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जर येत्या काही दिवसात याबाबतची माहिती आम्हाला मिळाली नाही तर माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी
- वैशाली बाफना, सिस्कॉम संस्था



हेही वाचा -

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा



 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा