Advertisement

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

समन्वयाच्या अभावामुळेच उच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देऊन एक आठवडा उलटून गेला, तरीही नवीन सुधारित यादी जाहीर झालेली नाही, याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के कोट्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात काही पालकांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्यानं पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेश वादात सापडण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व मेडिकल महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या 'डोमिसाईल'च्या अटी योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिला होता. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या परंतु, दहावी किंवा बारावी बाहेरील राज्यातून उत्तीर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.


म्हणून कॅव्हेट दाखल

राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयान (डीएमईआर) प्रवेशाची दुसरी यादी अद्याप जाहीर न केल्यानं पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यातील पालकांनी कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

डीएमईआरने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ८५ टक्के डोमिसाइलची अट योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाला कोणी आव्हान देऊन पुन्हा प्रवेशप्रक्रिया रेंगाळू नये म्हणून आम्ही कॅव्हेट दाखल केलं आहे. असं मत एका पालकांनी व्यक्त केलं.


समन्वयाचा अभाव

वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राज्य सरकारच्याच अखत्यारीतील अनेक विभागांचा (उच्च व तंत्रशिक्षण विभाग, तंत्रशिक्षण संचालनालय आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय) एकमेकांत समन्वय नाही.

समन्वयाच्या अभावामुळेच उच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देऊन एक आठवडा उलटून गेला, तरीही नवीन सुधारित यादी जाहीर झालेली नाही, याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे.


पाठपुरावा करण्यासाठी...

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबवली जात नसल्याबद्दल पाठपुरावा करण्यासाठी शालिनी ठाकरे यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव संजय देशमुख यांची गुरुवारी भेट घेतली.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास पात्र नसलेल्या ज्या ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे, ते आता महाविद्यालयात उपस्थित राहत असून त्यांना का रोखले जात नाही, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा - 

अकरावीसाठी यंदाही विशेष फेरी

विद्यार्थ्यांची तुलना करणं चुकीचं - एनसीईआरटी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा