नवी मुंबई महापालिका शाळांमधील अभ्यासक्रम 15 जूनपासून ऑनलाईन सुरू करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग दक्ष असून आधुनिक ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार आहे.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांच्या वितरणाचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले असून प्रत्येक शाळेमध्ये पालकांना आपल्या पाल्याची पाठय़पुस्तके वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. याशिवाय शासनाने इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतची पुस्तके http://cart.ebalbharti.in/BalBooks/ebooks.aspx या लिंकवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहेत.
दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत
वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था