Advertisement

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलेलं विशेष कोविड रुग्णालय गुरुवारपासून सुरू झालं आहे.

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था
SHARES

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलेलं विशेष कोविड रुग्णालय गुरुवारपासून सुरू झालं आहे. या रुग्णालयात ११८२ खाटांची व्यवस्था आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी या रुग्णालयात ५० खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्याची सूचना नवी मुंबई महापालिकेला टोपे यांनी केली. तसंच राज्य सरकारकडून २० व्हेंटिलेटर पुरवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी खासदार राजन विचारे आणि आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते. 

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयाच्या उभारणीचे आदेश दिले होते. या रुग्णालयात ऑक्सिजन सुविधेने सज्ज खाटांसह क्षकिरण चाचणी, डायलिसीस, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. याठिकाणी गंभीर अवस्थेतील करोना रुग्णांवरही उपचार करता यावेत, यासाठी ५० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या.

या रुग्णालयात ६० डॉक्टर, २५० परिचारिका व ३५० बहुउद्देशीय कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. पॉझिटिव्ह लक्षणे नसणाऱ्या आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या १० कोरोना रुग्णांना गुरुवारी येथे स्थलांतरित करण्यात आलं.



हेही वाचा -

बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा