लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. यावेळी बेस्टनं आपली हद्द पार केली असून, मुंबईसह विरार ते आसगावपर्यंत आपली वाहतूक सेवा देत आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला जीव धोक्यात घालून बेस्टचे कर्मचारी सेवा देत आहे. मात्र आता याच कर्मचाऱ्यांना कोरोनानं टार्गेट केलं आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळं ५४ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाल्याचा दावा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं केला आहे.
बेस्टकडून मृत कर्मचाऱ्यांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ११ जून ते १३ जूनपर्यंत आगार व आस्थापनावर मूक निदर्शनं केली जाणार असल्याचं समितीनं स्पष्ट केलं. दरम्यान, बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती नेते शशांक राव यांनी वारंवार विचारणा करूनही याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्पष्ट केलं.
कती समितीच्या मागण्या
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १२० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १०१५ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -
खाकी वर्दीतली माणुसकी, स्नेहसंमेलना ऐवजी केली अनोखी मदत
लोकल सेवेसाठी राज्य सरकारची केंद्राकडं मागणी