Advertisement

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

धनंजय मुंडे यांच्यासह स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण
SHARES

राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चलला आहे. कोरोनानं सामन्यांसह राजकीय नेत्यांनाही चांगलेच टार्गेट केलं आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. धनंजय मुंडे यांच्यासह स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे.

धनंजय मुंडे हे करोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. त्यामुळं आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती.

धनंजय मुंडे यांचे २ स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे. बुधवारी रात्री धनंजय मुंडे यांचा करोना चाचणीचा अहवाल आला. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा - अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४६ हजार ०७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचा - मीरा- भाईंदरमधील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ०९  हजार ३१७ नमुन्यांपैकी ९७ हजार ६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७४ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ०६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा -

मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी

पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली सज्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा