Advertisement

अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्यानंतर अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल १० दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्यानंतर अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल १० दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज (coronavirus live updates congress leader ashok chavan got discharged from hospital after covid 19 test negative) मिळाला आहे. चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले आहेत. याठिकाणी ते पुढील १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.

विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही अशोक चव्हाण कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी देखील झाले होते.

'अशी' झाली लागण

विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईला आलेले अशोक चव्हाण त्यानंतर पुन्हा नांदेड या त्यांच्या मतदारसंघात परतले होते. लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने लोकांमध्ये वावरावं लागत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चव्हाण यांनी मुंबईत दोनदा कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या.

हेही वाचा- कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण 

परंतु नांदेडला परतल्यावर त्यांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करून घेतली, मात्र ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं. त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं जाणवत नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. या दरम्यान वैद्यकीय गुंतागुंत वाढायला नको म्हणून त्यांनी आणि कुटुंबीयांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

नांदेडहून मुंबईला

एअरलिफ्टची परवानगी नाकारण्यात आल्याने २५ मे रोजी अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं. त्यानंतर मुंबईत लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोरोनाची लागण झालेले अशोक चव्हाण हे ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री ठरले होते. याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. परंतु त्यांनी देखील कोरोनावर जिद्दीने मात केली. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा