Advertisement

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ जणांना कोरोना

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ जणांना कोरोना
SHARES

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Housing minister Jitendra awhad) यांचा पहिला कोविड- १९ चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून सध्या ते आपल्या बंगल्यात क्वारंटाईन (home quarantine) झाले आहेत. तर त्यांच्याच बंगल्यात काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

त्यामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधितांची (covid-19) संख्या अवघ्या २४ तासांमध्ये ४६ वरून ७६ पर्यंत पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात ३० नवे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिलचं रेशन का नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल

कळवा-मुंब्रा या जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या परिसरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात मदतकार्य देखील सुरू आहे. या मदतकार्या दरम्यानच इतरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. यामध्ये आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ५ पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

काय म्हणाले आव्हाड?

दरम्यान 'मी बाहेर पडायचो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो म्हणून आता घरी बसावं लागतंय. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या. घरी बसा. सुरक्षित राहा. मी स्वत:ची 'कोविड १९' टेस्ट करून घेतली आहे. सुदैवानं ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. घरात बसण्याचं दु:ख काय असतं हे मला चांगलं माहीत आहे. मात्र, डॉक्टरी सल्ल्यानुसार मला १४ दिवस 'होम क्वारंटाइन' राहावं लागणार आहे. लवकरच आणखी चाचणी करणार आहे. ती सुद्धा निगेटिव्ह येईल. त्यानंतर १४ दिवसांनंतर मी परत तुमच्या सेवेत येईन,' अशा शब्दांत आव्हाड यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला आहे.

काम सुरू राहू द्या

क्वारंटाइन नसताना मी स्वत:च्या निरीक्षणाखाली जवळपास ८० हजार लोकांना रोज अन्नाची पाकिटं वाटायचो. इतर सोयीसुविधा द्यायचो. आता मला ते करता येणार नाही. या कामाला आता कुठं तरी खीळ बसेल असं वाटतंय. पण कुणीही उपाशी राहता कामा नये ही जी शपथ आपण घेतलीय, ती पूर्ण केली पाहिजे. हे काम असंच सुरू राहिलं पाहिजे, असं आवाहनही आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

हेही वाचा - जितेंद्र आव्हाड झाले होम क्वारंटाइन, कोरोना झालेल्या पोलिसाच्या संपर्कात


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा