Advertisement

केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिलचं रेशन का नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल

वार्षिक १ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना मे आणि जून महिन्यात धान्य देण्याचा आदेश (GR) नुकताच राज्य सरकारने काढला आहे. याचा अर्थ गरज असूनही केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिल महिन्यात धान्य मिळणार नाही.

केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिलचं रेशन का नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल
SHARES

वार्षिक १ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना मे आणि जून महिन्यात धान्य देण्याचा आदेश (GR) नुकताच राज्य सरकारने काढला आहे. याचा अर्थ गरज असूनही केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिल महिन्यात धान्य मिळणार नाही, त्यामुळे हा आदेश रद्द करून निम्न मध्यमवर्गीय केशरी रेशन कार्डधारकांनाही इतरांप्रमाणे धान्य देण्यात यावं अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी सरकारला केली आहे. 

काय म्हणाले फडणवीस?

संपूर्ण लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातील (maharashtra) गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांना तात्काळ रेशन मिळण्याची आवश्यकता असताना ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने जीआर काढून असं सांगितलं आहे की, महाराष्ट्रातील १ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटंबांना ज्यांच्याजवळ केशरी कार्ड (saffron ration card) आहे. अशा ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्यात कुठलंही रेशन (ration) मिळणार नाही. मे आणि जून महिन्यांत त्यांना ८ रुपये आणि १२ रुपये या भावाने रेशन देण्यात येईल. 

हेही वाचा- तर, बीएमसी, एमएमआरडीएचे पैसे वापरा, फडणवीस यांचा सरकारला सल्ला

मला असं वाटतं की हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. आज लाॅकडाऊन होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. लोकांना रेशनची नितांत आवश्यकता आहे. असं असूनही या महिन्यांत रेशन न देता मे आणि जून महिन्यांत त्यांना रेशन देऊ अशा प्रकारचा सरकारने काढलेला आदेश हा सर्वार्थाने चुकीचा ठरेल. तो तात्काळ सरकारने परत घ्यावा आणि गरीब तसंच निम्न मध्यमवर्गीयांना याच महिन्यात रेशन देण्यात यावं, अशा प्रकारची विनंती मी महाराष्ट्र सरकारला करत आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्यात लक्ष निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेमार्फत (ration) अंत्योदय योजना तसंच प्राधान्य लाभार्थी कुटुंब धारकांना नियमित धान्यासोबतच मोफत तांदळाचे वितरण सुरु आहे. मे आणि जूनमध्ये राज्यातील सुमारे ३ कोटी ८ लाख केशरी कार्डधारकांना गहू व तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामामध्ये पुरवठा विभागाची यंत्रणा व्यस्त आहे. अशा वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवठा केला जाणाऱ्या अन्नधान्याच्या कामामध्ये सहाय्य करावं. स्वस्त धान्य दुकान बंद असणे, जास्त दराने धान्य देणे, देय असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य वितरित करणे अशा प्रकारच्या तक्रारींवर वेळीच कारवाई होण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा- रेशन कमी दिलं, तर होईल कारवाई- छगन भुजबळ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा