Advertisement

मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी

बेस्ट प्रशासनाला सध्यस्थितीत योग्यरित्या वाहतूक सुविधा देणं कठीण होत आहे.

मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं राज्यातील वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता हळुहळू ही सेवा सुरू करण्यात येत आहे. बेस्टनं लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवली. आता बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सामान्यांनाही वाहतूक सेवा देत आहे. बेस्टचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळं त्यांच्यावरही घरी बसण्याची वेळ आली आहे. यामुळं सध्या मनूष्यबळ कमी पडत असून, बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी येत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकारनं ५५ ते ६० वर्ष व त्यापुढील नगरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. सरत्या वयात रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यामुळं कोरोनाचा धोका अधिक असतो. यामुळं सुरक्षेच्या दष्टीनं बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतला. अशातच कोरोनाची लागण झाल्यानं तब्बल २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं बेस्ट प्रशासनाला सध्यस्थितीत योग्यरित्या वाहतूक सुविधा देणं कठीण होत आहे.

हेही वाचा - बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

लॉकडाऊनपूर्वी बेस्ट दररोज ३१ ते ३२ लाख प्रवाशांना सेवा देत होती. मात्र, आता मनुष्यबळाअभावी ४ ते ५ लाख प्रवाशांना सेवा देतानाही नाकीनऊ येत आहे. ८ जूनला बेस्टनं ४.१९ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर दुसऱ्या दिवशी यात ५४ हजार प्रवाशांची भर पडली. प्रवासी वाढत असले तरी मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी येत असून सामान्य प्रवाशांची ससेहोलपट सुरूच आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आरक्षित बसव्यतिरिक्त खासगी कार्यालयातील कर्मचारी, दुकानदार, प्लम्बर यांसह अन्य व्यक्तींनाही तिकीट काढून प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे हळूहळू प्रवासी वाढत आहेत. पहिल्या दिवशी ४ लाख १९ हजार १५३ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. बेस्टने ३५०० पैकी २,५०० बस चालवण्याचे नियोजन केले होते. मात्र गर्दीच्या वेळी केवळ २ हजार १३२ बसगाडय़ा धावल्या. ९ जूनला प्रवासी संख्येत आणखी वाढ झाली.

या दिवशी ४ लाख ७३ हजार ६८० प्रवाशांनी प्रवास केला. मात्र प्रवाशांचे पहिल्या दिवशी झालेले हाल दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. मंगळवारीही केवळ २,३०० पर्यंत बस धावल्या. त्यानंतर बुधवारीही सकाळी गर्दीच्या वेळी तीच परिस्थिती होती. मर्यादित प्रवाशांमुळे भरून आलेली बस मधल्या थांब्यांवर थांबत नाही. त्यामुळे ताटकळत दुसऱ्या बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.

८ जूनला बेस्टला तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून ४० लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. ९ जूनला हेच उत्पन्न ४५ लाख ५३ हजार २८ रुपयांपर्यंत पोहोचले. त्याशिवाय, बेस्ट प्रशासन सध्या उपक्रमाकडे १२० डबलडेकर बस आहेत. परंतु सध्या त्या वापरात नाहीत. प्रवाशांची गर्दी पाहता या बस २ ते ३ दिवसांत पुन्हा सेवेत आणल्या जाणार आहेत. कुर्ला स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे स्थानक याशिवाय मुंबई शहरातील काही भागांत धावणाऱ्या बस गर्दीच्या ठिकाणी चालवण्याचं नियोजन केले जात आहे.



हेही वाचा -

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

Coronavirus Pandemic: मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा