Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५२ हजार ४४५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच १४९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५६७ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी  दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर ९ जून रोजी ६१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ जून रोजी रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५२ हजार ४४५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २३ हजार ६९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावासह मृत्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुनमधील पहिल्या ९ दिवसांत दरदिवशी सरासरी ५३ मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मे महिन्यांतील पहिल्या ९ दिवसांत हे प्रमाण ४१ होतं. परंतु, मे महिन्याच्या तुलनेत जुनमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणं ३० टक्क्यांनी वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये मुंबईत ४८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर, १ जून रोजी ४० जणांचा मृत्यू करोनामुळं झाला होता. तर, त्यानंतरच्या ३ दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला. या आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यूनं उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं मुंबईतील रोजची रूग्णवाढ आणि मृत्यू दर खाली येऊ लागला आहे.

सोमवारी रूग्णदर ३.५. टक्के तर मृत्यू दर ३ टक्क्यांपर्यंत आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येनं ५० हजारांचा आकडा पार केला आहे. मुंबईची दैनंदिन रूग्णवाढ ३.५ आली आहे तर भायखळा आणि माटुंगा-शीव-वडाळा परिसरात १.६ इतकी नोंदवली आहे. महापालिकेच्या ई विभागात भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा अशा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर येतो. त्यामुळे या भागात नागरिकांचा जवळून संपर्क आल्यानं एप्रिल आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली.

सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  775

सीलबंंद इमारती 4071

24 तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  8494

CCC1 मधील अति जोखीम  27,708

CCC1 मध्ये भर्ती असलेले अतिजोखिम 97074

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा