Advertisement

दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत

नवी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दिव्यांग रुग्णांसाठी रुग्णालय सुरू केलं आहे.

दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत
SHARES

नवी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दिव्यांग रुग्णांसाठी रुग्णालय सुरू केलं आहे. सीवूड येथील खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांग रुग्णांची विशेष खबरदारी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्यरित्या उपचार करण्यासाठी हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम नवी मुंबई महापालिकेने सुरू केला आहे. दिव्यांगांसाठी या रूग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांगासाठीचे महाराष्ट्रातील हे पहिले स्पेशल कोविड हॉस्पिटल कार्यान्वित झाले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या दिव्यांग व्यक्तिंसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे. त्यासाठी सी वूड नेरूळ येथील न्युरोजन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट या रूग्णालयातील 75 बेड्सपैकी 25 बेड्स कोरोनाबाधित दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी राखीव ठेवल्या आहेत. 

दिव्यांगांना हालचाल करणे सुलभ जावे अशा विशेष खोल्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. व्हिलचेअर, दिव्यांगांना वापरण्यास सोयीची अशी स्वच्छतागृहे आहेत. आँटिझम, सेरिब्रल पाल्सीसारखे आजार, इंटेक्च्युअल डिसँबिलीटीचा विचार करून व्यवस्था करण्यात आली आहे. या रूग्णालयामध्ये आँक्सीजन सपोर्ट, व्हेंटिलेटर, इंटेसिव्ह केअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर दिव्यांगांवरील उपचाराचा विचार करून वैद्यकीय क्षेत्रातील अद्यावत उपचार पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा