अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरू राहणार

एप्रिलमध्ये (April) शाळा (Schools) सुरू ठेवण्याच्या निर्णयासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी दिलं आहे.

ज्या शाळा कोविड (Covid 19) काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांनाच एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं, मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच मे (May) महिन्यात शाळांना सुट्टी असणार आहे. ज्यानंतर पुढील सत्र जून (June) च्या मध्यादरम्यान सुरू होणार असल्यानं शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनामुळे (Coronavirus) शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागानं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या (Summer Holiday) रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोमवारी आली होती.

सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ''ज्या शाळा कोव्हीड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिलमध्ये त्यांना शाळा सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. ज्यांनी काही व्यवस्था करून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी विनाकारण शाळा सुरू ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. तसंच मे महिन्यामध्ये शाळा सुरू ठेवाव्यात असे निर्देश दिले नसल्याने आणि पुढचे शैक्षणिक सत्र जूनच्या मध्यावर सुरू होणार असल्यामुळे मुलांच्या सुट्टीचेही कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे शासनाचे निर्देश नीट समजून घ्यावे.''

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.


हेही वाचा

दहावी-बारावी परीक्षेचे निकाल उशीरानं जाहीर होण्याची शक्यता

सेंट झेवियर्सच्या परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

पुढील बातमी
इतर बातम्या