Advertisement

सेंट झेवियर्सच्या परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

पण महाविद्यालयाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात आहे.

सेंट झेवियर्सच्या परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
SHARES

सेंट झेवियर्स महाविद्यालय (St. Xavier's College) विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेणार आहेत. पण महाविद्यालयाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात आहे. महाविद्यालयाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली.

कॉलेज अधिकाऱ्यांना केलेल्या ऑनलाइन अपीलमध्ये, विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात एकूण १,२८७ सही गोळा केल्या. परंतु, झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, कोविड लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे ते गेल्या दोन वर्षांपासून लेक्चरला उपस्थित राहिले नाहीत. आतापर्यंतची सर्व लेक्चर्स ऑनलाइन झाली आहेत; त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची या निर्णयावर नाराजी आहे.

२८ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी कॉलेजने आपल्या वेबसाइटवर आसनव्यवस्था केली आहे. लेक्चर्स २६ मार्चला संपणार आहेत. विद्यार्थ्यांना ना 'अभ्यासासाठी सुट्टी' दिली जात आहे ना पेपरमधील थिअरी प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा वेळ दिला जात आहे.

या संदर्भात, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिक्षण सहसंचालकांना महाविद्यालयांना पत्र लिहिण्याचे निर्देश दिले होते.

यावर सोनाली रोडे, सहसंचालक म्हणाल्या, “आम्ही ज्या महाविद्यालयांनी सेमिस्टर ६ च्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना विनंती करत आहोत. कारण असं केल्यानं गुणांमध्ये असमानता आढळेल. तसंच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे."हेही वाचा

"मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा"

मराठीच्या पुस्तकात इंग्रजी शब्दांचाही होणार वापर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा