Advertisement

दहावी-बारावी परीक्षेचे निकाल उशीरानं जाहीर होण्याची शक्यता

राज्यातील साडे सहा हजार शाळांमध्ये बोर्डाचे पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत.

दहावी-बारावी परीक्षेचे निकाल उशीरानं जाहीर होण्याची शक्यता
SHARES

दहावी आणि बारावीच्या (MSBSHSE, MSBSHSE Exam Result 2022) निकालाला (result)उशीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील साडे सहा हजार शाळांमध्ये बोर्डाचे (The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education ) पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. शिक्षक बोर्डाचे पेपर तपासायला तयार नाहीत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं (Maharashtra state permanently unaided school action committee ) उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.

कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणीसाठी घेऊन जायला शिक्षकांनी नकार दिला आहे. यामुळे दहावी (SSC Result 2022 ) बारावी बोर्ड (HSC Result 2022) परीक्षेचे निकाल उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात.

मात्र दहावी बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) वेळेत निकाल जाहीर होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



हेही वाचा

यंदा शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नाही, वर्गही भरणार पूर्ण वेळ

सेंट झेवियर्सच्या परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा