Advertisement

यंदा शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नाही, वर्गही भरणार पूर्ण वेळ

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नाही, वर्गही भरणार पूर्ण वेळ
SHARES

राज्यातील शाळा १०० टक्के उपस्थितीसह (schools opened in Maharashtra) सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. परिपत्रक जारी करून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

यासोबतच परिपत्रकात नमूद केलं आहे की, शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती (schools open with 100%) सह शाळा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (School reopen in Maharashtra). मात्र यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना (No summer vacations in Maharashtra schools) मुकावं लागणार आहे.

या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असंही आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवडयात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावेत असे आदेश दिले आहेत.

शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र यातही संपूर्ण उपस्थितीसह विद्यार्थ्यांना शाळांना परवानगी नव्हती. मात्र आता अखेर शालेय शिक्षण विभागाकडून १०० टक्के उपस्थितीसह शाळा सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे.



हेही वाचा

सेंट झेवियर्सच्या परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

"मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा"

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा