दहावी आणि बारावीची ऑक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा रद्द

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यंदा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार नाही. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी माहिती दिली.

वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा घेतल्या जातात. पण यंदा कोरोनामुळे ऑक्टोबरमध्ये फेरपरीक्षा होणार नाहीत. कोरोनाचं संकट असल्यानं ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.

दहावीमध्ये जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये १ लाख ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.


हेही वाचा

पदवीच्या परीक्षा घेण्यास राज्यपालही सकारात्मक- उदय सामंत

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुढील बातमी
इतर बातम्या