१४ नोव्हेंबरपर्यंत भरा १० वीच्या परीक्षेचा अर्ज

मार्च २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येऊ शकतो. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर होती.

वाढीव शुल्कासहीत ३१ नोव्हेंबरपर्यंत

सर्व विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावेत यासाठी ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता आला नाही. तर त्या विद्यार्थ्याला वाढीव शुल्कासहीत ३१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल.

आधारकार्ड सक्ती नाहीच

एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तरीही तो विद्यार्थी १० वीसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतो. आधार कार्ड नसेल तर त्याचा निकालही आडवला जाणार नाही. निकालाआधी प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधारकार्ड असावं अशी सक्ती करण्यात आली होती. मात्र पालकांनी विरोध केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आता विद्यार्थ्यांना आधारकार्डाशिवायही १० वीच्या परीक्षेसाठी अर्ज करता येईल.

या लिंकवर भरा अर्ज

www.maharashtrasscboard.maharashtra.gov.in या मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर १० वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल.

हेही वाचा-

विद्यार्थ्यांनो डोन्ट वरी, आधारकार्डची सक्ती नाही!

पुढील बातमी
इतर बातम्या