Advertisement

बोर्डाच्या परीक्षेला आधारकार्ड घेऊनच जा! नाहीतर...


बोर्डाच्या परीक्षेला आधारकार्ड घेऊनच जा! नाहीतर...
SHARES

विद्यार्थ्यांनो तुम्ही जर दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा देणार असाल तर आतापासूनच आपला आधारकार्ड बनवून घ्या. कारण यंदाच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आता आधारकार्ड आवश्यक आहे. निकाल लागण्यापूर्वी आधारकार्ड विद्यार्थ्यांनी सादर करायचे आहेत.


यावर्षीपासून आधारकार्डची सक्ती

गेल्यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केले होते. मात्र गेल्यावर्षी याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यावर्षीपासून आधारकार्डची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू आहे. या नोंदणीदरम्यान आधारकार्डची माहिती देणे बंधनकारक आहे.


आधारकार्ड नसेल तर निकाल मिळणार नाही

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना आधारकार्ड नसेल त्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वी आधारकार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. असे हमीपत्रच विद्यार्थ्यांच्या मुख्यधपकांना देणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल त्या विद्यार्थ्यांना या वर्षी निकाल देण्यात येणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे आधारकार्ड नाही म्हणून कोणाचाही परीक्षेचा अर्ज फेटाळला जाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज भरणे शाळांना बंधनकारक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा