Advertisement

विद्यार्थ्यांनो डोन्ट वरी, आधारकार्डची सक्ती नाही!


विद्यार्थ्यांनो डोन्ट वरी, आधारकार्डची सक्ती नाही!
SHARES

विद्यार्थ्यांनो जर तुम्ही दहावी किंवा बारावीच्या बोर्डाची परीक्षा देणार असाल आणि आधारकार्ड नाही म्हणून चिंतीत असाल तर, चिंता सोडून द्या. कारण दहावी बारावीच्या निकालासाठी राज्य शिक्षण मंडळाने केलेली आधारकार्डची सक्ती आता मागे घेतली आहे.


शिक्षण मंडळाचा यू टर्न

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आधारकार्ड सक्तीचे केले होते. पण या सक्तीला विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर शिक्षण विभागाने आधारकार्ड नसल्याने कोणतेही निकाल थांबवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
बोर्डाचा अर्ज भरताना जरी आधारकार्ड नसले तरी निकालाआधी आधारकार्ड नोंदणी आवश्यक होती. ज्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल त्या विद्यार्थ्यांना निकाल मिळणार नाही, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले होते. त्यांनतर गोंधळलेल्या पालकांनी या आधारकार्ड सक्तीला विरोध केला. कमी कालावधीत आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ होणार असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली. त्यांनतर अशी कोणतीही सक्ती करणार नसल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
सर्व स्तरावर आधारकार्ड आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी देखील आधारक्रमांक आवश्यक असल्यामुळे आधारकार्डाची नोंद असावी एवढेच सांगण्यात आले आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.



हेही वाचा - 

आता पॅन कार्डसोबत जोडा आधारकार्ड


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा