Advertisement

आता पॅन कार्डसोबत जोडा आधारकार्ड


आता पॅन कार्डसोबत जोडा आधारकार्ड
SHARES

केंद्र सरकार हळूहळू सर्व सरकारी सेवांसाठी आधारकार्ड बंधनकारक करत आहे. आता आयकर विभागाने देखील पॅन कार्डसह आधार कार्ड लिंक करण्यासाठी ई-कनेक्टिव्हिटी ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी आयकर विभागाने त्यांच्या ई-फायलिंग या संकेतस्थळावरील होमपेजवरhttps://incometaxindiaefiling.gov.in नवीन लिंक जाहीर केली आहे. त्यामुळे आता दोन्ही युनिक क्रमांक एकमेकांना जोडण्यास मदत होईल.

आधार कार्डला पॅनकार्डशी कसे कराल लिंक

सर्वप्रथम ई-फाइलिंग संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर होमपेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करावा लागेल

नवीन पेज उघडल्यानंतर यामध्ये आपला आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकून त्याहिशोबाने सर्व तपशील द्यावे लागतील

त्यानंतर यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे सर्व तपशीलाची पडताळणी केली जाईल

सर्व माहिती बरोबर असल्यास आधार आणि पॅन दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक झाल्याची पुष्टी मिळेल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा