दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागलं आहे,. बुधवारी २० मार्चला भिवंडी परिसरातील एका शाळेतून समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे सध्या दहावीची परीक्षा सुरू असून २० मार्च रोजी समाजशास्त्र १ विषयाचा पेपर होता. परंतु परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी व्हॉट्सअॅपवर समाजशास्त्राचा पेपर व्हायरल झाला. बोर्डाच्या परीक्षेला आलेला पेपर आणि व्हायरल झालेल्या पेपरमध्ये बरेच साम्य असल्याने काही जणांनी याबाबत तक्रार दाखल केली. 

विज्ञान पेपर १ व्हायरल

१५ मार्चला विज्ञान पेपर १ वेळी देखील व्हॉट्अपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. याबाबत भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शिक्षण विभागकडेही याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही याबाबत पत्र लिहिले असून त्याची दखल मात्र अद्याप शिक्षणमंडळ किंवा शिक्षणमंत्र्यांनी घेतलेली नाही. सध्या मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर दहावी परीक्षा घेण्यात येत आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचा शुक्रवारी २२ मार्च रोजी शेवटचा पेपर आहे. 


हेही वाचा -

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! मराठीमध्ये पहा आयपीएल

महापालिकेच्या शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण


पुढील बातमी
इतर बातम्या