Advertisement

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! मराठीमध्ये पहा आयपीएल

क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक खुशखबर आहे. VIVO IPLचे सामने प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहेत आणि तेही मराठीतून. २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPLचे रंगतदार सामने प्रेक्षकांना मराठीतून ‘स्टार प्रवाह’वर पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! मराठीमध्ये पहा आयपीएल
SHARES

देशभरातील क्रिकेट प्रेमींना सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे वेध लागले आहेत. अशातच क्रिकेट शौकिनांसाठी एक गुड न्युज आली आहे. आयपीएल प्रेमींना आता आपल्या आवडत्या स्पर्धेचा आनंद आता मराठीत लुटता येईल.


स्टार प्रवाहवर संधी 

सध्या देशात सर्वाधिक उत्सुकता आहे ती VIVO IPL २०१९ ची. क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक खुशखबर आहे. VIVO IPL चे सामने प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहेत आणि तेही मराठीतून. २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPL चे रंगतदार सामने प्रेक्षकांना मराठीतून ‘स्टार प्रवाह’वर पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. विशेष म्हणजे VIVO IPL सामन्यांच्या आधी ‘क्रिकेट नाका’ या अनोख्या कार्यक्रमातून क्रिकेट सामन्यांचा उहापोह केला जाणार आहे. अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे ही कलाकार मंडळी आपल्या खुमासदार शैलीने सामन्यांविषयीची उत्सुकता वाढवतील.


मराठीतून समालोचन

मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आता VIVO IPL २०१९च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद आपल्या भाषेत घेता येणार आहे. आरजे आशुतोष, कुणाल दाते आणि सुनील वैद्य आयपीएल सामन्यांचं मराठीतून समालोचन करणार आहेत. तर संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडीत, हृषिकेश कानिटकर, आणि अविष्कार साळवी ही क्रिकेट तज्ज्ञ मंडळी सामन्यांची रंगत आणखी वाढवणार आहेत.

तेव्हा मराठीतून क्रिकेटचे सामने पाहण्याची ही दुर्मिळ संधी चुकवू नका. नक्की पाहा २३ मार्चचा पहिला सामना आणि दर रविवारी VIVO IPL सायंकाळी सात वाजल्यापासून फक्त स्टार प्रवाहवर, कारण खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे.



हेही वाचा - 

वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणारच; आयसीसीचं स्पष्टीकरण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा