Advertisement

महापालिकेच्या शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं आता शिक्षकांना संवाद आणि परस्परसंवादी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं शिक्षकांना संवाद आणि परस्परसंवादी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांचं इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व वाढावं म्हणून त्यांना हे प्रशिक्षण दिलं जात आहे.


प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळण्यासाठी गुगल डिव्हाइसेस आणि डिजिटल क्लासरूमसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिका शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शब्दसंग्रह, व्याकरणाची कौशल्यं, वाक् प्रचारांचा वापर अशा मुद्द्यांवर प्रशिक्षण केंद्रीत करण्यात येत आहे. तसंच या प्रशिक्षणाचा उपयोग उभ्यासक्रम शिकवतानाही करण्यात यावा, असंही महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.


इंग्रजीची गरज

विद्यार्थी आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या प्रशिक्षणाचा फायदा होऊ शकतो, असं एका शिक्षिकेने बोलताना सांगितलं. इंग्रजीमध्या मागे पडत असल्यामुळे पालिकेतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडे सर्वांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. अनेकदा अनेक विद्यार्थी शिक्षक वेगवेगळ्या आर्थिक परिस्थिती आणि निरनिराळ्या पार्श्वभूमीतून येतात. अनेकांची मातृभाषाही इंग्रजी नसते. अशावेळी त्यांना या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल, असं पालिकेच्या शिक्षिका ललिता सुर्वे यांनी सांगितलं.


डिजिटल क्लासरूम्स

गुगल डिव्हाईसेस, इंटरनेट तसंच प्रेझेंटेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषय समजवून सांगण्यासाठी करत असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रकाश चरते यांनी दिली. सध्या पालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम्सदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक शिक्षकांना त्याचा वापर कसा करावा याबद्दल अद्यापही माहिती नाही. त्याचंही प्रशिक्षण शिक्षकांना सध्या देण्यात येत आहे. केवळ पुस्तक आणि अभ्यासक्रमात गुंतून न राहता रिसर्च, एक्सपरिमेंट याचाही वापर केला जावा हे यामागील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.



हेही वाचा -

पगार वेळेत न मिळत असल्यामुळे बेस्ट कामगार साधणार मुंबईकरांशी संवाद

विद्यापीठाच्या ७६ परीक्षेच्या तारखेत तर २७ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा