12 वी पुरवणी परीक्षेच्या प्रवेश अर्जाची तारीख वाढवली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत 19 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. 20 जूनपर्यंत आवेदनपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

याआधी बारावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 14 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. 14 जूननंतर फॉर्म भरणाऱ्यांना विलंब शुल्क द्यावे लागणार आहे. पण ऑनलाईन आवेदन भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत अशा तक्रारी मंडळाकडे येत होत्या. म्हणून मंडळाने ऑनलाईन प्रवेशाच्या मुदतीमध्ये वाढ केली असून 19 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.


हे देखील वाचा - 

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एकाच शाळेतले सगळे विद्यार्थी १२वीत नापास!


1 ते 10 जुलैच्या दरम्यान प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा, तर 11 ते 29 जुलैदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. यंदा बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली होती. यावर्षी राज्याचा निकाल 89.50 टक्के इतका लागला आहे. परीक्षेत 10.50 टक्के विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. या आधी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये परीक्षेची दुसरी संधी मिळत होती. मात्र, यावर्षीपासून वर्ष वाया जाऊ नये, यासाठी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्येच होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या