Advertisement

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
SHARES

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलैमध्ये त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. शिक्षण मंडळाने या पुरवणी (रिएक्झाम) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या जाहीर वेळापत्रकानुसार 1 जुलै ते 29 जुलैदरम्यान ही पुरवणी परीक्षा होणार आहे.
1 ते 10 जुलैच्या दरम्यान प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा. तर, 11 ते 29 जुलैदरम्यान लेखी परीक्षा होणार असल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केले. 

यंदा बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली होती. यावर्षी राज्याचा निकाल 89.50 टक्के इतका लागला आहे. परीक्षेत 10.50 टक्के विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. या आधी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबरमध्ये परीक्षेची दुसरी संधी मिळायची. मात्र, यावर्षीपासून वर्ष वाया जाऊ नये, यासाठी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्येच होणार आहे. जवळपास 1 लाख 50 हजार 72 विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत.

www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर अथवा खासगी शिकवणीद्वारे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये, असे अवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा