दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन

राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २३ एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय.

याविरोधात मुंबईत शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी एल्गार केला. वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घ्यायला विरोध केलाय. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन आंदोलन केलं.

दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. पोलिसांच्या ४ गाड्या आंदोलनस्थळी दाखल होत्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं होतं.


हेही वाचा

कोरोनामुळे १० वी, १२ वी परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

यंदाही ऑनलाईनच होणार अंतिम वर्षाच्या परीक्षा

पुढील बातमी
इतर बातम्या