एफवायची दुसरी मेरिट लिस्ट १४ जुलैला

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पुन्हा एकदा पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वारे वाहायला लागले आहेत. त्यानुसार शनिवारी १४ जुलै २०१८ रोजी पदवी प्रवेशाची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच मुंबई विद्यापीठानं पदवी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात केली होती. या पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरिट लिस्ट १८ जून २०१८ रोजी जाहीर केली होती. परंतु या यादीत अल्पसंख्याक महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यानं त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर राज्य सरकारनं या विरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेत पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या मेरिट लिस्टला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता.

मागासवर्गीय कोटा रद्दच

दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयानं सुनावणी करताना मुंबई विद्यापीठातील संलग्नित अल्पसंख्याक कॉलेजांमध्ये देण्यात येणारा मागासवर्गीय कोटा रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया येत्या शनिवारी १४ जुलैपासून सुरू करण्यात येत असून येत्या शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास एफवायची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

१८ जुलैला तिसरी यादी

शनिवारी एफवायची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १६, १७, १८ जुलैला दुपारी २.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी व फी भरायची आहे. त्यानंतर बुधवारी १८ जुलैला तिसरी आणि शेवटीची यादीची जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १९, २० जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी व फी भरायची आहे. विद्यार्थ्यांना एफवाय प्रवेशप्रक्रियेबाबत सर्व माहिती mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.


हेही वाचा -

काॅलेजांचा मागासवर्गीय कोटा रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

आता काॅलेजांमध्ये वाटणार भगवद्गीता!


पुढील बातमी
इतर बातम्या