Mumbai University exam 2022: उन्हाळी सत्राच्या (सत्र ६) परीक्षा ऑनलाईन, तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठानं २०२२ च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १९ एप्रिल २०२२ पासून परीक्षा सुरु होत आहेत.

मुंबई विद्यापीठानं शुक्रवारी जाहीर केलं की, १९ एप्रिलपासून TYBCom परीक्षा सुरू होतील. त्यानंतर TYBA आणि TYBSc परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू होतील.

यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइन तर पारंपारीक कला, वाणिज्य, विज्ञान आणि स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाइन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइन होणार आहेत.

पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपारीक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत पदवी अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळानं घेतला आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑफलाइन घेण्याचा निर्णयही परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र सत्र ६ च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाइन घेण्यात येणार आहेत.

पदवीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सत्र २ नियमित व बॅकलॉग परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात येतील. तर सत्र १, ३ व ५ बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. सत्र ४ ची नियमित व बॅकलॉग परीक्षाही ऑनलाइन घेण्यात येईल.

सत्र २ व ४ नियमित व बॅकलॉग या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येतील. तसंच सत्र १ व ३ बॅकलॉगच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येईल.

ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येण्याऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्यूत्तर परीक्षा ह्या ५० टक्के बहुपर्यायी प्रश्न व ५० टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.

व्यवस्थापन, तंत्रज्ञान व आंतर-विद्याशाखेच्या परीक्षा ऑफलाईन व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र १ ते ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील.

शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र २ व ४ परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात येतील. तर सत्र १ व ३ बॅकलॉग या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येतील. आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात येतील. तसेच विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग ह्या ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील.


हेही वाचा

मुंबई विद्यापीठातील 'या' विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन

रतन टाटांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अधिकचे गुण

पुढील बातमी
इतर बातम्या