Advertisement

रतन टाटांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अधिकचे गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

रतन टाटांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अधिकचे गुण
SHARES

बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये एका गुणाचा चुकीचा प्रश्न विचारल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडळाच्या लक्षात ही चूक आली आणि हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा एक गुण देण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.

इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक असल्याची तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली. ‘सिम्पल सेन्टेन्स बनवा’ या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच ‘सिम्पल सेन्टेन्स’ असल्यानं विद्यार्थी प्रश्न सोडवताना गोंधळून गेले होते.

सोशल मीडियामध्ये कोणतेही विधान महान व्यक्तिंच्या नावे प्रसारित करण्याचा प्रकार सर्रासपणे होतो. मात्र हा प्रकार बोर्डाच्या परीक्षेतही व्हावा, हे आर्श्चयच. उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होणारे एक वाक्य बारावीच्या परीक्षेतही नमूद केल्यानं गोंधळ उडाला. मंडळाच्या नियंत्रण समितीच्या लक्षात ही चुकी का आली नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला.

सोशल मीडियावर ‘रतन टाटा यांच्या नावानं’ व्हायरल झालेल्या या कोटमध्ये म्हटलं आहे की, “मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेतो आणि ते योग्य बनवतो”.

पण, अनेक वर्षांपासून रतन टाटा यांनी हा कोट त्यांचा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सात वर्षांपूर्वी, एचईसी बिझनेस स्कूल ऑफ पॅरिस, फ्रान्सनं 'ऑनरीस कॉसा' पदवी दिली होती. या कार्यक्रमादरम्यान, प्रश्नोत्तराच्या सत्रात रतन टाटा यांना या कोट संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावेळी त्यांनी हे त्यांचे ‘कोट’ नसल्याचं स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही तर टाटा समूहाच्या प्रमुखांनी त्यावेळी म्हटलं होतं की, सोशल मीडियावर त्यांना श्रेय देऊन अनेक गोष्टी प्रसिद्ध केल्या जातात.



हेही वाचा

जेईई-मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश; तारखा पुढे ढकलण्याची मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा