निकाल जाहीर झाला, पण आम्ही नाही पाहिला!

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. प्रत्येकवेळी नवीन दुखणे वर येत आहे. रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने कॉमर्सचा महत्त्वाचा निकाल जाहीर केला. मात्र, बुधवार उजाडला तरी विद्यार्थ्यांना अद्याप निकाल दिसलेला नाही.

निकाल अजूनही का दिसला नाही?

टीवायबीकॉमचा पाचव्या आणि सहाव्या सत्राचा निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाल्यामुळे सर्व्हर डाऊन झाला. पण निकाल अपलोड झालाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोमवारी निकाल बघता येणार नसल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र मंगळवारही गेला आणि बुधवारही उजाडला तरी अनेक महाविद्यालयांना त्यांचा निकाल समजलेलाच नाही.

मुंबई विद्यापीठाची निकाल जाहीर करण्याची ३१ जुलै, ५ ऑगस्ट, १५ ऑगस्ट अशा डेडलाईन चुकल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला कोर्टात खेचले. त्यावेळी ३१ ऑगस्ट ही शेवटची डेडलाईन विद्यापीठाकडून न्यायालयात देण्यात आली आहे. यात टीवायबीकॉम आणि लॉच्या महत्त्वाच्या निकालाचा समावेश होता.

'लॉ'चा निकालही दिसला नाही

बुधवारी दुपारी 'लॉ'चा जाहीर करण्यात आला पण तोह विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर दिसलाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकूण ४७७ निकलांपैकी ४०० निकाल जाहीर करण्यात आले. 


हेही वाचा - 

टीवायच्या निकालांसाठी 'टास्क फोर्स'


पुढील बातमी
इतर बातम्या