बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामुळं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या अभिनेता आरोह वेलणकरनं एका ‘मीट अँड ग्रीट’ सेशनचं आयोजन करत आपल्या चाहत्यांची भेट घेतली. या अनोख्या सोहळ्याला महाराष्ट्रभरातून आलेल्या आपल्या चाहत्यांसोबत गप्पा-गोष्टी, गाणी- डान्स करत आरोहनं मजा-मस्ती केली.
आरोह वेलणकर या ‘मीट अँड ग्रीट’ सेशनच्या आयोजनाविषयी म्हणाला की, ‘रेगे’ या सिनेमामुळं मला लोक ओळखू लागले आणि माझा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. नुकताच बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केल्यावर माझ्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं माझ्या लक्षात आलं. कधी भेटून, कधी मेसेजस, फोन काॅल्स करून तर बऱ्याचदा सोशल मीडियाव्दारे वेगवेगळे फॅन्स माझ्याबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त करत होते. या फॅन्समुळंच मी बिग बॉसच्या घरात खरं तर, सहा आठवडे राहू शकलो. त्यामुळं त्यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्याचं माझ्या मनात होतं. या कारणामुळंच त्यांना मी एक छोटीशी ट्रिट दिली.
हेही वाचा -
सैफ अली खान या चित्रपटात साकारणार नागा साधूची भूमिका, ट्रेलर झाला प्रदर्शित
रस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मन