Advertisement

सैफ अली खान या चित्रपटात साकारणार नागा साधूची भूमिका, ट्रेलर झाला प्रदर्शित

सैफ अली खानच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

सैफ अली खान या चित्रपटात साकारणार नागा साधूची भूमिका, ट्रेलर झाला प्रदर्शित
SHARES

'सेक्रेड गेम'नंतर अभिनेता सलमान खान 'लाल कप्तान' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 'लाल कप्तान'मध्ये सैफ आली खान नागा साधूच्या रूपात दिसणार आहे. सैफचा चित्रपटातील लुक पाहून चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

सैफ अली खानच्या डायलॉगनं ट्रेलरची सुरुवात होते. घोड्यावर बसलेला सैफ एका व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण गावभर फिरवताना दिसतो.‘आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है उसे वापस लाने के लिए. आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में’ असा त्याचा डायलॉग ट्रेलरमध्ये येतो. याशिवाय सैफचा लुक डेंजरच वाटत आहे. सैफच्या कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नागा साधूंचा लुक असलेला सैफ अतिशय रागिट स्वभावाचा दिसत आहे

'लाल कप्तान' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ११ ऑक्टोबर ठरवण्यात आली होती. मात्र चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांच्या जीवना भोवती फिरताना पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

रस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा